Skip to main content

Posts

Showing posts from 2016
वाघांची लढाई अस्तित्वासाठी हद्द प्रस्थापित करण्यासाठी आक्रमक झालेल्या नर वाघांपासून पिल्लांचे संरक्षण करण्यासाठी माया वाघिणीने काही दिवसांपूर्वी या वाघांबरोबर मिलन करण्याचा पर्याय स्वीकारला. अवघ्या दीड वर्षांच्या पिल्लांना मातृत्वाची गरज असताना मायाचे नैसर्गिक नियम बाजूला ठेवून मीलनास तयार होणे, ही वन्यजीव अभ्यासक आणि वनाधिकाऱ्यांच्या दृष्टीकोनातून धक्कादायक घटना आहे. चोहोबाजूने घेरलेल्या ‘व्याघ्र बेटां’मध्ये सुरू असलेल्या अस्तित्वाच्या लढाईचे हे बोलके उदाहरण आहे.  ता डोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील माया ही सर्वांची लाडकी वाघीण. या जंगलातील पर्यटन वाढविण्यात उल्लेखनीय वाटा असलेल्या मोजक्या वाघांमधील लोकप्रिय वाघीण म्हणून माया ओळखली जाते. रस्त्यावरून पिल्लावळ घेऊन मनमुराद भटकंती करणारी ही माया वन्यजीव छायाचित्रकारांची फोटो काढण्याची हौस पूर्ण भागवते. त्यामुळे वनाधिकाऱ्यांबरोबरच नियमित येणाऱ्या निसर्गप्रेमींचा तिच्यावर विशेष जीव आहे. पण काही दिवसांपूर्वी मायाने या सगळ्यांना एक धक्का दिला. तिची पिल्ले अवघी दीड वर्षांची असून, स्वावलंबी झालेली नाहीत तरी द...
वन्यजीव संवर्धनात तंत्रज्ञानाचा ठसा ब्रिटिशांनी आखून दिलेल्या कायद्यानुसार वन विभागाने तब्बल सहा दशके चौकटीत राहून काम केले; मात्र बदलत्या काळानुसार वन्य प्राण्यांच्या संरक्षणाची आव्हानेही बदलली आहेत. त्यामुळे वन विभागानेही कात टाकली असून, वाघांसह अन्य वन्यजीवांच्या संवर्धनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने उल्लेखनीय पावले उचलली जात आहेत. सध्या वन्य प्राण्यांवर नजर ठेवण्यासाठी रेडिओ कॉलरिंग, टॅगिंग, सोलर बेस्ड ट्रान्समीटर आदी तंत्रज्ञानांचा वापर केला जातो आहे.  0000000000000    भारतातील समृद्ध वनसंपदा आणि वन्यजीवन पाहून ब्रिटिश राज्यकर्ते भारावून गेले होते. त्या काळात वन्य प्राण्यांची संख्याही मुबलक असल्याने ते वाचवण्यापेक्षाही स्वसंरक्षणार्थ लोक त्यांच्या शिकारी करण्यासाठी बक्षिसे जाहीर करत होते; मात्र भविष्यात हे चित्र बदलणार असून, या प्राण्यांना वाचवण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत, ही दूरदृष्टी ब्रिटिशांकडे होती. त्यामुळे त्यांच्या पुढाकारातूनच वने आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विविध कायदे अस्तित्वात आले. काळानुसार त्यात क...
आता स्थलांतर वाघांचे   ..................................... व्याघ्र संवर्धनाची दिशा निश्चित करण्यासाठी ‘वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर’ आणि ‘ग्लोबल टायगर फोरम’तर्फे व्याघ्र संवर्धनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी आशियातील विविध देशांच्या मंत्र्यांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान वाघांची संख्या अत्यल्प असलेल्या देशांमध्ये वाघांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भारतातील काही वाघांचे लवकरच कंबोडियात स्थलांतर होणार आहे.   जंगलातील अतिशय देखणा, रुबाबदार आणि राजबिंडा प्राणी असलेल्या वाघाला वाचविण्यासाठी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जगात शंभर वर्षांपूर्वी तब्बल एक लाख वाघ जंगलात वास्तव्यास होते. घरातील अनेक बुजूर्ग मंडळींनी वाघांचा हा घटता आलेख अनुभवला आहे. राजामहाराजांच्या काळात, अगदी ब्रिटिशांची राजवट संपल्यानंतरही काही वर्षे वाघांना मारण्यासाठी सरकारकडून बक्षीस जाहीर केले जात असे. या काळात बदुंकांच्या साह्याने शिकार करणे सोपे झाल्याने झपाट्...
फॅशन इंडस्ट्रीचे मृगजळ पर्यावरणाच्या मूळावर    मोठमोठ्या हॉटेलमध्ये होणारे फॅशन शो, मॉलमधील काचेच्या कपाटातील कपड्यांनी भारतीय ग्राहकांवर मोहिनी घातली आहे. पण अब्जावधी रुपयांची उलाढाल असलेल्या या उद्योगक्षेत्रातून लाखो टन कचऱ्याची निर्मितीही होते आहे. पर्यावरणीयदृष्ट्या विघटनास अवघड असलेल्या कपड्याच्या कचऱ्याचे करायचे काय... हा नवा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. ................ देशातील वाढता ई-कचरा, जैववैद्यकीय कचऱ्याची दखल घेऊन केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच या कचऱ्याच्या विल्हेवाटीची नियमावली जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ शहरातील राडारोडा आणि ओला-सुक्या कचऱ्यासंदर्भातील निमयावली प्रसिद्ध झाली आहे. पुढील दहा ते पंधरा वर्षांत या सर्वांबरोबरच कपड्यांच्या कचऱ्याला सामोरे जावे लागणार आहे. पर्यावरणीयदृष्ट्या धोकादायक असलेल्या या कचऱ्याला पेलण्यासाठी आत्तापासूनच खरे तर स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज आहे. आपण दररोज वापरणारे कपडे खराब झाल्यावर अनेकदा गरजू व्यक्ती, भांडी विकणाऱ्या बाईला देतो किंवा थेट फेकून देतो. पुढे या ...
अनुभवा वाघांच्या पलीकडचे जंगल रंग बदलणारे सरडे, सरपटणारे प्राणी, वैविध्यपूर्ण रंग आणि मधुर शीळ घालून आकर्षित करणारे पक्षी, फुलपाखरे, आपली नजर चुकवून सभोवताली फिरणारे गवताळ प्रदेशातील प्राणी अन् आकर्षक फुलांनी बहरलेले डेरेदार वृक्ष बघण्यातही एक वेगळी मजा आहे. वाघांचे अस्तित्व नसलेल्या अभयारण्यांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. पुणे विभागातील मयुरेश्वर चिंकारा अभयारण्य, रेहेकुरी काळवीट अभयारण्य, भीमाशंकर शेकरू अभयारण्य आणि करमाळा-नान्नज माळढोक अभयारण्य आता वेगळ्या रूपात पर्यटकांसमोर येणार आहे. ................... चैत्राली चांदोरकर .....................  रोजच्या धकाधकीच्या जीवनचक्रातून रिफ्रेश होण्यासाठी सुट्टीच्या दिवशी निसर्गरम्य, शांत ठिकाणी फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे; पण वाढत्या संख्येमुळे या निसर्गरम्य स्थळांनाही जत्रेचे स्वरूप आल्याचे दिसते. मोठमोठी हॉटेल्स, गेमिंग झोन, शहरी वस्तूंनी फुललेल्या बाजारपेठा अन् वाहतुकीची कोंडी.... हेच चित्र एखाद्या हिलस्टेशनवर अनुभवायला मिळत...
किल्ल्यांसाठी हवाय ‘होमवर्क’ छत्रपती शिवाजी महाराजांनी साकारलेल्या सह्याद्रीतील किल्ल्यांप्रती असलेली दुर्गप्रेमींमध्ये संवेदनशीलता आणि तळमळीला युनेस्कोचे पदाधिकारी हुरळून जाणार नाहीत. त्यांच्या निकषांमध्ये उतरण्यासाठी किल्ल्यांचे शास्त्रीय पद्धतीने केलेले 'डॉक्युमेंटेशन' दाखविण्याची गरज आहे. जागतिक वारसा स्थळाच्या स्पर्धेतील मानांकन मिळविण्यासाठी आपल्याला किल्ल्यांचा प्रचंड 'होमवर्क' करावा लागणार आहे.... जैववैविध्याने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातील ३९ स्थळांना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट समितीने तीन वर्षांपूर्वी हिरवा कंदिल दाखवला. रशियातील सेंट पिट्सबर्गमध्ये झालेल्या त्या बैठकीत पश्चिम घाटाच्या प्रस्तावाचे महत्त्व पटवून देताना भारताच्या प्रतिनिधींना खूप मेहनत घेतली होती. हा अहवाल अंतिम टप्प्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पश्चिम घाटाने चार वर्षांचा खडतर प्रवास अनुभवला. जागतिक व्यासपीठावरील तज्ज्ञांच्या मनात या घाटाविषयी कुतूहल निर्माण करीत असतानाच तेथील नैसर्गिक संपत्तीचे शास्त्रीय महत्त्व बिंबविण्याची प्रक्रिया भारतीय प्रतिनिधींसाठी मौल्यवान अ...