खवलोत्सव
खवले मांजराच्या नावाने
चांगभलं म्हणत डूगवे ग्रामस्थांनी खवले मांजराला पालखीत घालून नाचविले, वेळ होती
डूगवेतील खवलोत्सवाची. पालखी घराघरात फिरली, ग्रामस्थांनी भक्तिभावाने
खवलेमांजराचे औक्षण केले. पालखी परत सहाणेवर बसली, तेथे खेळे/ नमन सदर करण्यात आले,
त्यात खवल्याचे सोंगसुद्धा आले. कार्यक्रमाच्या शेवटी समस्त डूगवे ग्रामस्थ,
सह्याद्री निसर्ग मित्रचे कार्यकर्ते, वनविभाग, पोलीस या सर्वांच्या वतीने
ग्रामदेवतेला साकडे घालण्यात आले. बा गावदेवी आमच्या गावात खवलेमांजर आहे त्याचे
रक्षण कर,त्यांची संख्या वाढव, तसेच तस्करी चोरता व्यापार यात अडकलेल्या लोकांना
चांगली बुद्धी दे. जगातील सर्व खवले मांजर प्रजातीचे रक्षण कर असे गाऱ्हाणे
घालण्यात आले. तसेच त्यावेळी सर्व ग्रामस्थांनी खवले मांजराच्या रक्षणाची शपथ
घेतली. शेवटी महाप्रसाद होऊन कार्यक्रम संपन्न झाला.
सह्याद्री
निसर्ग
मित्र,
वनविभाग
व
पोलीस
यांच्या
मार्गदर्शनाखाली
गेली
चार
वर्षे
कोकणात
खवले
मांजर
संरक्षण
संवर्धनाबरोबरच
त्याच्या
शास्त्रीय
अभ्यासाचे
काम
चालू
आहे.
डूगवे
या
लहानशा
गावानेदेखील
खवलेमांजर
संरक्षणाचे
काम
करण्याचा
विडा
उचलला
आहे.
याच
प्रयत्नांचा
एक
भाग
म्हणून जागतिक खवले
मांजर
दिनानिमित्त
१५
फेब्रुवारी
२०२०
रोजी
चिपळूण
येथील
डूगवे
गावामध्ये
जागतिक
खवलेमांजर
दिनानिमित्त
खवलोत्सवाचे
आयोजन
करण्यात
आले
होते,
ठराविक
छापाच्या कार्यक्रमांना बगल देत डूगवे ग्रामस्थांनी आतिशय उत्साहात पारंपारिक पद्धतीने
हा खवलोत्सव साजरा केला.
- खवले मांजराची वैशिष्ट्ये
- खवले मांजर हा निसर्गसाखळीतील एक महत्त्वाचा एकमात्र खवलेधारी प्राणी आहे.
- जगात खवले मांजराच्या ८ प्रजाती आढळतात. ४ प्रजाती आफ्रिकेत; तर ४ आशिया खंडात आढळतात.
- भारतात चीनी खवले मांजर व भारतीय खवले मांजर या दोन प्रजाती आढळतात.
- पूर्वोत्तर व हिमालय वगळता सर्वत्र भारतीय खवले मांजर आढळते.
- सुमारे पाच फूट लांब संपूर्ण शरीरावर खवले असलेल्या या प्राण्याला दात नसतात; पण त्याच्या सुमारे एक फूट लांबीच्या चिकट जिभेच्या साह्याने तो हजारोच्या संख्येने वाळवी, मुंग्या खातो. धोका वाटताच अंगाचे वेटोळे करतो, ते कोणालाही सोडवता येत नाही.
- आयुसीएनच्या रेड डाटा बुकनुसार भारतीय खवले मांजर धोक्यात असलेला प्राणी आहे.
- भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये खवले मांजराचा शेड्युल ए ‘क’मध्ये समावेश. त्यामुळे त्याला वाघाइतके संरक्षण मिळाले आहे.
- जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात खवले मांजराची शिकार होते आहे.
- त्याच्या खवल्यांना आंतराष्ट्रीय पातळीवर मागणी आहे.
- मुख्यत: चीनी औषधात ते वापरले जाते.
- आंतरराष्ट्रीय टोळ्या या बेकायदा कृत्यात सहभागी आहेत.
- कोकणतूनही मोठ्या प्रमाणात शिकार होते.
चैत्राली चांदोरकर
000000
Comments
Post a Comment