त्यांच्या खाजगी आय़ुष्यात डोकावणारे तुम्ही कोण ? दुसऱयांच्या घरात काय सुरु आहे, हे जाणून घेण्यात अधिक रस असलेल्या माणसांना वन्यप्राण्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याची चटक लागली आहे. लहानसा नाकतोडा असो, सरडा, पक्षी अगदी वाघ, सिंह, मगर, गेंडा सगळ्यांच्या मिलनाचे ( प्रचलित शब्द – रोमान्स) फोटो काढण्याची स्पर्धेने सध्या सर्व संकेतांच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. सोशल मीडियावर स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी वन्यजीवांच्या मिलनाचे फोटों बाजार सुरु आहे. वन्यप्राण्यांच्या आयुष्यातील अतिशय खाजगी अशी ही घटना चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिलाय. ... काही वर्षांपूर्वी फॅन थ्रोटेड लिझार्ड (Fan Throated Lizard) या सरड्याचे फोटो काढण्याचे पेव आले. बंदुकीसारख्या मोठमोठ्या लेन्सचे कॅमेरे घेऊन आलेल्या या अतिउत्साही छायाचित्रकारांनी या सरड्याचा मिलन काळ चव्हाट्यावर आणला. एरवी हा सरडा शेजारून गेला तरी त्याच्याकडे डुंकूनही न बघणारे छायाचित्रकार जेव्हा तो सरडा माजावर येतो, तेव्हा त्याला सब्जेक्ट समजतात. मादीला आकर्षिक करण्यासाठी धडपडणाऱया या सरड्याला चोहोबाजूने घेरतात. त्याच्या गळ्याखालचा सप्तरंगी प...