वाघांची लढाई अस्तित्वासाठी हद्द प्रस्थापित करण्यासाठी आक्रमक झालेल्या नर वाघांपासून पिल्लांचे संरक्षण करण्यासाठी माया वाघिणीने काही दिवसांपूर्वी या वाघांबरोबर मिलन करण्याचा पर्याय स्वीकारला. अवघ्या दीड वर्षांच्या पिल्लांना मातृत्वाची गरज असताना मायाचे नैसर्गिक नियम बाजूला ठेवून मीलनास तयार होणे, ही वन्यजीव अभ्यासक आणि वनाधिकाऱ्यांच्या दृष्टीकोनातून धक्कादायक घटना आहे. चोहोबाजूने घेरलेल्या ‘व्याघ्र बेटां’मध्ये सुरू असलेल्या अस्तित्वाच्या लढाईचे हे बोलके उदाहरण आहे. ता डोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील माया ही सर्वांची लाडकी वाघीण. या जंगलातील पर्यटन वाढविण्यात उल्लेखनीय वाटा असलेल्या मोजक्या वाघांमधील लोकप्रिय वाघीण म्हणून माया ओळखली जाते. रस्त्यावरून पिल्लावळ घेऊन मनमुराद भटकंती करणारी ही माया वन्यजीव छायाचित्रकारांची फोटो काढण्याची हौस पूर्ण भागवते. त्यामुळे वनाधिकाऱ्यांबरोबरच नियमित येणाऱ्या निसर्गप्रेमींचा तिच्यावर विशेष जीव आहे. पण काही दिवसांपूर्वी मायाने या सगळ्यांना एक धक्का दिला. तिची पिल्ले अवघी दीड वर्षांची असून, स्वावलंबी झालेली नाहीत तरी द...