वन्यजीव संवर्धनात तंत्रज्ञानाचा ठसा ब्रिटिशांनी आखून दिलेल्या कायद्यानुसार वन विभागाने तब्बल सहा दशके चौकटीत राहून काम केले; मात्र बदलत्या काळानुसार वन्य प्राण्यांच्या संरक्षणाची आव्हानेही बदलली आहेत. त्यामुळे वन विभागानेही कात टाकली असून, वाघांसह अन्य वन्यजीवांच्या संवर्धनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने उल्लेखनीय पावले उचलली जात आहेत. सध्या वन्य प्राण्यांवर नजर ठेवण्यासाठी रेडिओ कॉलरिंग, टॅगिंग, सोलर बेस्ड ट्रान्समीटर आदी तंत्रज्ञानांचा वापर केला जातो आहे. 0000000000000 भारतातील समृद्ध वनसंपदा आणि वन्यजीवन पाहून ब्रिटिश राज्यकर्ते भारावून गेले होते. त्या काळात वन्य प्राण्यांची संख्याही मुबलक असल्याने ते वाचवण्यापेक्षाही स्वसंरक्षणार्थ लोक त्यांच्या शिकारी करण्यासाठी बक्षिसे जाहीर करत होते; मात्र भविष्यात हे चित्र बदलणार असून, या प्राण्यांना वाचवण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत, ही दूरदृष्टी ब्रिटिशांकडे होती. त्यामुळे त्यांच्या पुढाकारातूनच वने आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विविध कायदे अस्तित्वात आले. काळानुसार त्यात क...