फुकट्यांसाठी वसुलीपथक सोसायटीतील मेंटेनन्स न भरणाऱ्या सभासदांना वठणीवर आणणार Chaitrali.Chandorkar@timesgroup.com पुणे : किरकोळ कारणांमुळे पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या वादाचा ‘इगो’ मनात ठेवून सोसायटीचा देखभाल खर्च (मेंटेनन्स) भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या उपद्रवी सभासदांना वठणीवर आणण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाने कंबर कसली आहे. आर्थिक परिस्थिती असतानाही मुद्दाम थकबाकी ठेवणाऱ्या सभासदांच्या दारात वसुली अधिकारी ठाण मांडून बसणार आहेत. गेल्या महिनाभरात या अधिकाऱ्यांनी २० लाख रुपये सभासदांकडून वसूल केले आहेत. वेगाने विकसित होत असलेल्या पुणे शहरामध्ये सध्या सुमारे पंधरा हजार सोसायट्या आहेत. यातील प्रत्येक सोसायट्यांमधील अडचणी वेगवेगळ्या असल्या तरी थकबाकीदारांची समस्या सगळ्यांना भेडसावत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे सोसायटीचा देखभाल खर्च देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची संख्या वाढत असून, ही उपद्रवी मंडळी पदाधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी झाली आहेत. एकाच सोसायटीत शेजारी राहायचे मग वैर कशाला घ्यायचे, अशा मानसिकतेतून पदाधिकारीच सभासदांवर कारवाई करण्यास पुढाकार घेत नसल्याचे ...